Sharad Pawar । अमरावती : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. अगोदर शिवसेना (Shivsena) नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या दोन मोठ्या राजकीय भूकंपांनंतर राज्यात आणखी भूकंप होणार असा दावा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे. अशातच आता येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देतील, असा दावा बड्या नेत्याने केला आहे. (Latest Marathi News)
Manipur । पुन्हा हिंसाचाराचा भडका! संतप्त जमावाकडून मुख्यमंत्र्यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न
आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की’ “मी मागील आठ दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी मी लालबागच्या राजाकडे (Lalbagh Raja) मागितलं की, नरेंद्र मोदी यांचे काम पाहून अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनीही सरकारला पाठिंबा द्यायला हवा. असे साकडे मी गणरायाकडे केले आहे,” असे रवी राणा म्हणाले आहेत.
Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
पुढे ते म्हणाले की, “मला विश्वास आहे की हा चमत्कार हा येत्या १५ दिवसांत पाहायला मिळणार आहे. लवकरच शरद पवारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार तुम्हाला दिसेल”, असा दावा रवी राणा यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शरद पवार खरंच सत्तेत सहभागी होतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Rakhi Sawant । राखी सावंतने प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचून तुम्ही व्हाल थक्क