अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget sessions) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडाची काल एक अत्यंत महत्वाची बैठक झाली. यावेळी राऊतांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याची देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी राऊतांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील जेठालालच्या जीवाला धोका; 25 लोक हत्यारे घेऊन घराबाहेर
या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), त्याचबरोबर नाना पटोले देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये कसबा चिंचवड निकालाबाबत देखील चर्चा झाली.
मोठी बातमी! सोनिया गांधींची प्रकृती खालवली, रुग्णालयामध्ये दाखल
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत नाही. मात्र त्यावर हक्कभंगाची जी समिती नेमली ती न्यायाला धरुन नाही. ज्यांनी आरोप केले तेच या समितीत असतील तर न्याय कसा होईल, असे मोठे वक्तव्य शरद यावर यांनी यावेळी केले आहे.
धक्कादायक! भिंत तोडून मध्यरात्री दोन तरुण शिरले शाहरुख खानच्या घरामध्ये