मोठी बातमी! दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या निर्णयावर शरद पवार यांचे थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Big news! Sharad Pawar's direct letter to the Union Minister on the decision to import dairy products

शरद पवार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगेवेगळे प्रयत्न करत असतात. शरद पवार यांनी केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे दूध उत्पादकता शेतकऱ्यांचा तोटा होऊ शकतो. यामुळे याबाबत विचार करावा अशी मागणी करत शरद पवार यांनी थेट केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना एक पत्र लिहिले आहे.

राज्यामध्ये गारपिटसह वादळी पावसाचा इशारा,’या’ जिल्ह्यांना मोठी चिंता!

ट्विट करत शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले, आज मला इंग्रजी वृत्तपत्रांमधील एक बातमी मिळाली ज्यामध्ये केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा लोणी आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा इरादा आहे.

कांद्यापाठोपाठ आता कलिंगडही शेतकऱ्यांना रडवणार! मिळतोय फक्त ‘इतका’ भाव

या संदर्भात केंद्र सरकारचा कोणताही निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य असेल कारण या उत्पादनांच्या आयातीचा थेट देशांतर्गत दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. दुग्ध उत्पादक शेतकरी अलीकडेच अभूतपूर्व कोविड-19 संकटातून बाहेर आले आहेत आणि अशा निर्णयामुळे डेअरी क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गंभीरपणे अडथळा निर्माण होईल.

साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबांनी मागितली माफी; म्हणाले…

कृपया माझ्या चिंतेकडे लक्ष द्यावे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्यास आणि मंत्रालयाने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा कोणताही निर्णय घेण्यापासून परावृत्त केल्यास मला आनंद होईल. असं त्यांनी लिहिले आहे.

रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडचा दुष्काळ हटणार!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *