मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्बेत ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांना मुंबईमधील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार असून 2 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीने दिली आहे.
पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनाच मागितले पैसे, ‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार
मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्बेत बिघडली होते त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. राष्ट्रवादीने याबाबत एक ट्विट देखील केले आहे. ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे”.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. #NCP pic.twitter.com/YpjqjcFw1E
— NCP (@NCPspeaks) October 31, 2022
शरद पवार याना 2 नोव्हेंबरला संध्याकाळी डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर शरद पवार 3 तारखेला हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमाला हजेरी देखील लावणार आहेत.
Instagram: बिग ब्रेकिंग! इंस्टाग्रामचे अकाउंट होतंय अचानक सस्पेंड