हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे गौतम अदानी (Gautam Adani) चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अदानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गौतम अदानींमुळे वीज आणखी महागणार, छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी चांगलेच आपटले आहेत. आता ते थेट 21 व्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये दररोज कपात होत असून रोज नवीन धक्क्यांना ते सामोरे जात आहेत.
एक मुलगा असूनसुद्धा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार; ‘या’ दिवशी करणार लग्न
मागच्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत. अदानी समुहाने तीन कंपन्यांचे शेअर्स गहाण ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. आता अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी यांनी त्यांचे शेअर्स एसबीआयसीएपी ट्रस्टी कंपनीकडे (SBICAP Trustee) गहाण ठेवले आहेत.
मोठी बातमी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना न्यायालयीन कोठडी