कुस्ती ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. पुण्यात (Pune) १० जानेवारीपासून पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. मोठ्या व मानाच्या कुस्ती स्पर्धांपैक एक स्पर्धा म्हणून ‘महाराष्ट्र केसरी’ ची ओळख आहे. दरम्यान काल पुण्यात ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा शिवराज राक्षे याने पटकावली आहे.
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेची मानाची पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) विरुद्ध शिवराज राक्षे (Shivraj demons) या दोघांमध्ये लढत झाली. शिवराजने एका मिनिटामध्ये महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर स्वतःचे नाव कोरले.
मोठी बातमी! गडकरींना आलेल्या धमकीच्या फोन कॉलचे कर्नाटक कनेक्शन?
दरम्यान, या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, ब्रिजभूषण सिंह, क्रीडामंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. महत्वाची बाब म्हणजे शिवराज आणि महेंद्र हे दोघे हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत.
पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणाऱ्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…