मोठी बातमी! शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश

Big news! Shubhangi Patil's official entry into Shiv Sena

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Independent candidate Shubhangi Patil) यांचा पराभव करत नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. दरम्यान, आज शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेयामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला अडकणार विवाहबंधनात!

शुभांगी पाटीला यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मी आता शिवसैनिक म्हणून लढणार ‘आम्ही सगळे एक आहोत, एक राहू’ अशा शब्दात शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती, ती मी पूर्ण करेन असं देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

महत्वाची बातमी! भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज

सत्यजीत तांबे विजयी

दरम्यान, नाशिक विभागामध्ये एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती. यानंतर काल त्याची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली असून त्यांचा पराभव झाला.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ चॅलेंजवरून शंभुराज देसाई संतापले; म्हणाले, “हिंमत असेल तर…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *