Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! श्रीगोंदा-पुणे बसचा भीषण अपघात

Big news! Srigonda-Pune bus accident

बस अपघाताच्या घटना कायम कुठे ना कुठे घडत असतात. या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. अशीच सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. 27 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान श्रीगोंद्यावरून पुण्याला चाललेल्या एसटी बसचा पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्याची महत्वाची घोषणा

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बस व दुचाकीच्या या अपघातामध्ये एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार तरुण हा दुचाकीवरून उरुळी कांचनकडे निघाला होता. यावेळी सहजपूर फाट्याजवळ बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली पडला. व त्याचा जागीच मृत्यू झाला.

शिंदे-फडणवीस यांच्यात संघर्ष सुरू? ‘या’ कारणामुळे राज्यात चर्चांना उधाण

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तेथील स्थानिक नागरिक आणि पोलीस देखील दाखल झाले. या घटनेने तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

उर्फी जावेदचा अनोखा फॅशन सेन्स; नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर

Spread the love
Exit mobile version