
अग्निपथ योजने (Agniveer Bharti) अंतर्गत आतापर्यंत हजारो सैनिक भरती (Army Recruitment) झाले आहेत. प्रशिक्षणानंतर जवानांना पोस्टींग देखील देण्यात आले. भारतीय सैन्यात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती रॅली २०२३ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह विविध राज्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. यावेळी अग्निवीर भरतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
सपना गिलने केले पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप; म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला…”
भरतीसाठी गेल्या वर्षी अग्निपथ योजना सुरू करण्यात आली होती. अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी अग्निवीर पात्रता बदलण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना यावर्षी सैन्यात भरती व्हायचे आहे त्यांनी Joinindianarmy.nic.in या Join Indianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यावर तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
“तोपर्यंत मागे हटणार नाही, जोपर्यंत…”, एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम
आता १०वी नंतर ITI प्रमाणपत्र असलेले उमेदवार देखील यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र धारण करणारे अर्ज करण्यास पात्र आहेत. नवीन नियमांनुसार, आता औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI-पॉलिटेक्निक पास आऊट देखील अग्निवीर भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी तरुणांनी अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्यावी.
गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करा; आदित्य ठाकरेंचे चिंचवड मध्ये आवाहन