
क्रिकेटप्रेमींसाठी सध्या एक वाईट बातमी समोर आली आहे. सध्या टी-२० विश्वचषक २०२२ (T-20 World Cup) अतिशय रोमांचक पद्धतीने सुरू आहे. यामध्येच आता ऑस्ट्रेलियातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ॲलन थॉमसन याचे सोमवारी अचानक निधन झाले आहे. याच्या निधनाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट (Cricket) विश्वावर शोककळा पसरली आहे.
Sharad Pawar: शरद पवारांना आज डिस्चार्जची शक्यता नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज ॲलन थॉमसन याचे सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी निधन झाले वयाच्या ७६ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला”. त्याची काहीदिवसांपूर्वीच हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया झाली होती. पण त्याचा जीव वाचू शकला नाही.
हृदयदावक! मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
दरम्यान , ॲलन थॉमसन हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिला विकेट घेणारा पहिला गोलंदाज होता. त्याने इंग्लंडच्या जेफ्री बॉयकॉटची ५ जानेवारी १९७१ मध्ये विकेट घेतली होती. ही विकेट त्यांच्या त्याच्या कारकिर्दीमधील एकमेव एकदिवसीय क्रिकेट आणि एकमेव विकेट होती. परंतु त्याच्या जाण्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात – राजू शेट्टी