इंदापूरमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबरला ऊस परिषद होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. दरम्यान महागाई वाढल्यामुळे उसाचा भाव वाढवा अशी त्यांची मागणी आहे. आता इंदापूरमध्ये देखील ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेमध्ये वेगवेगळ्या मागण्या मांडण्यात येणार आहेत.
न्यायालयाचा मोठा निर्णय! पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही करू शकता व्हिडीओ रेकॉर्डिंग
ऊस परिषदेमध्ये ‘या’ असणार प्रमुख मागण्या
१) ऊसाला एकरकमी एफ.आर.पी मिळालीच पाहिजे.
२) मागील हंगामातील एफ.आर.पी+२०० रुपये मिळण्याबाबत.
३) चालू हंगामातील एफ.आर.पी+३५० रुपये मिळालेच पाहिजे.
आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘या’ बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
४) काटमारी संपुष्ठात आणण्यासाठी वजन काटे ऑनलाईन झालेच पाहिजेत.
५) मशीनने तोडलेल्या उसाची कपात ४.५ टक्के ऐवजी १.५ टक्के झाली पाहिजे.
६) उत्पादन खर्चाला दिड पट हमीभाव मिळाला पाहिजे.
काय सांगता! एका मराठमोळ्या चाहत्याने चक्क 57 भाषांमध्ये कारवर छापलं रतन टाटांंच नाव
७) सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे.
८) शेतीपंपास दिवसा १२ तास पूर्णक्षमतेने वीज मिळालीच पाहिजे.
९) ऊस वाहतूकदारांची तोडणी कामगारांकडून फसवणूक टाळण्यासाठी कै.गोपीनाथ मुंडे महामंडळातर्फे तोडणी कामगार उपलब्ध करून दिले पाहिजेत.
ब्रेकिंग! बँकांचे नवीन नियम, आता फोन पे आणि गुगल पेवर लागणार शुल्क