
मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना (Self-respecting Farmers Association) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाली आहे. कारखानदार शेतकऱ्यांच्या मालात काटा मारून त्यांची फसवणूक करतात. यावर सरकारने निर्णय घ्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आता त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार अखेर शेतकऱ्यांना पावले; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, पुढच्या हंगामापासून डिजिटल वजन काटे देखील होणार आहेत. यामुळे काटामारीला देखील आळा बसणार आहे.
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, “माध्यमांसमोर माझ्याशी चर्चा करून दाखवावी”
सरकारने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. त्याचबरोबर दोन्ही साखर कारखानदारांमधील हवेतील अंतराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना (Farmer) दिले आहे. त्याचबरोबर पुढील हंगामापासून वजनकाट्यासाठी डिजिटल वजन काटे सुरू करावेत, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
चिखली येथे मंळगंगा युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन