मुंबई : सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांची आई आणि अभिनेत्री इंदिरा देवी (Indira Devi) यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, मागच्या काही आठवड्यांपासून इंदिरा देवी यांची तब्येत खराब होती. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते, मात्र आज पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Ambadas Danave: शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा – अंबादास दानवे
माहितीनुसार, इंदिरा देवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत पद्मालय स्टुडिओत आणले जाईल. यानंतर ज्युबिली हिल्स येथील महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
महेश बाबूच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या माहितीनुसार, “ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या पत्नी आणि महेश बाबू यांच्या आई घटामनेनी इंदिरा देवी यांचे काही वेळापूर्वी निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त होत्या. आज सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव पद्मालय स्टुडिओ येथे चाहत्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Cotton: यंदा कापसाला उच्चांकी बाजारभाव मिळणार का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारभाव