
राज्यातील भाजपचे मंत्री अनेक महापुरुषांबद्दल वादंग्रस्त विधान करत आहेत. भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता यामध्येच चंद्रकांत पाटील यांनी देखील महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केलं त्यामुळे नवीन वाद निर्माण होऊन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
“आपण कोणालाच घाबरत नाही पण…”; शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया
हे सर्व घडत असतानाच आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्याकडे असलेल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा सुषमा अंधारे यांनी दिला आहे. सुषमा अंधारे यांनी राजीनाम्याचं पत्र फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे.
बिग ब्रेकिंग! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”.
आली लहर केला कहर! उर्फी जावेदने चक्क सायकलच्या चेनपासून बनवला ड्रेस; पाहा VIDEO