मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma) ही छोट्या पडद्यावरील मालिका लोकप्रिय आहे. चाहते या मालिकेला भरभरून प्रेम देतात. मालिकेबरोबर चाहते त्यातील पात्रांना सुद्धा भरभरून प्रेम देतात. या मालिकेमध्ये दयाबेन ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानी (Disha Vakani) संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर तरुणीसोबत झालेली ओळख एका तरुणाला पडली महागात
काही रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जातोय की, दिशाला गळ्याचा कॅन्सर झाला असून ती या आजाराशी झुंज देत आहे. तिच्या दयाबेन या व्यक्तिरेखेमुळे तिला गळ्याचा कॅन्सर झाला आहे अशा चर्चाना उधाण आले आहे. , तारक मेहता मालिकेत दिशा एकदम वेगळ्याच आवाजामध्ये बोलायची. त्यामुळे तिला गळ्याचा त्रास होऊन कॅन्सर (Cancer) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Siddharth-Kiara: ठरलं! सिद्धार्थ-कियारा ‘या’ दिवशी करणार लग्न? तारीख आली समोर
दरम्यान २०१९ मध्येच दिशाने तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडली होती. यामागचं कारण तिनं मॅटर्निटी लीव्ह (Maternity leave) घेतली आहे असं सांगितलं गेलं होतं. तिने शो मध्ये याव यासाठी चाहते तिची कायम वाट पाहत होते. मेकर्सने देखील दिला अनेकदा बोलावले पण तिने कायम नकारच दिला.
परतीच्या पावसाने सोयबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान, बळीराजा चिंतेत