गेल्या अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी तलाठी भरतीच्या घोषणेची वाट पाहत होते. यामध्ये राज्य सरकार तब्बल 4625 पदांची भरती करून घेणार आहे. ही मेगा भरती 17 ऑगस्ट 12 सप्टेंबरच्या दरम्यान होणार असल्याचं शासनाने जाहीर केल आहे. त्यामुळे तलाठी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा आदेश महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांसाठी थेट ऑनलाइन परीक्षा घेऊन सेवा भरती केली जाणार आहे.
गुंडाळलेला मृतदेहांचा ढीग, जखमींवर गॅलरीत उपचार सुरू; रेल्वे अपघातानंतरचे दृश्य पाहून बसेल धक्का
राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये एकूण 4 हजार 625 पदांची भरती व ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतलाय. उमेदवाराला जाहिरातीत केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करावी लागणार आहे. उमेदवाराला https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.
अजित पवारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले…
पदांच्या संख्येत आणि आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता शासनाच्या संबंधित विभागांने दर्शविली आहे. पदे कमी जास्त झाल्यास व आरक्षणामध्ये काही बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर याची घोषणा केली जाईल. आयोगाच्या वेबसाईटवर केलेल्या सूचनांच्या आधारे, परीक्षेमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची प्रक्रिया पार पाडली जाईल.
ब्रेकिंग! पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण