अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. यामध्येच आता पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur highway) लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! भर सभेत गोळ्या मारलेले आरोग्यमंत्री नबा दास यांचे निधन
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे लेन सोडून दुसऱ्या बाजूला आली. आणि एका चारचाकी गाडीवर आदळल्याची धक्कदायक घटना घडली आहे. काल संध्याकाळी ४:३० च्या सुमारास हा अपघात झाला आहे.
अपघातामध्ये तीन लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या तीन जखमींपैकी एकाची प्रकृती जास्त गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींची नवे अद्याप समजू शकलेली नाहीत.