
गावांमध्ये गायरान जमिनीवर अनेक संसार थाटलेले संसार तुम्ही पाहिले असतील. परंतु, राज्य सरकारच्या महसूल विभागाने या जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. यामुळे हे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Aambedkar) यांच्या पुढाकाराने याबाबत एक दिलासा देणारी बातमी समोर येण्याची शक्यता आहे.
मुलीच्या जन्मानंतर आलियाला पाहून चाहते खुश; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाधीन करण्यात यावेत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. यावर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, सोलापूर, बीड यांसारख्या अनेक जिल्ह्यांत गायरान जमिनींवर अतिक्रमण झाले आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पिकांसाठी लागणारी कीटकनाशके आता थेट बांधावर मिळणार
खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून बेघर व भूमिहीन लोक गायरान जमिनीवर आक्रमण करून राहत आहेत. सुमारे 25 – 30 वर्षे ही कुटुंबे याठिकाणी वस्ती करून राहत आहेत. यामुळे त्यांना तिथून अचानक हटवणे हे प्रशासनाला कठीण जाणार आहे. या लोकांकडे स्वतःची घरे नसल्याने यानंतर ते कुठे राहणार हा देखील प्रश्न पुन्हा उपस्थित राहू शकतो.
सचिन तेंडुलकरची मुलगी ‘या’ मुलाला करतीये डेट; सोशल मीडियावर फोटो झालेत व्हायरल
यामुळे या लोकांच्या बाबतीत सहानभुतीपूर्वक विचार व्हावा. असे मंत्रिमंडळातील जेष्ठ सदस्यांचे मत आहे. गायरान जमिनीवर अतिक्रमण झालेल्या ठिकाणी गावठाणाचे पट्टे तयार करून, तेथील अतिक्रमण नियमानुकूल करावीत असा विचार सरकार करत आहे. यामुळे सरकारचा ( State Government) देखील फायदा होणार आहे.
उदयनराजे भोसले नाराज?, प्रतापगडावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत