शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार तर ७ जण गंभीर जखमी
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. यामुळे आता याप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार निम्म्या किमतीत वीज
शुक्रवारी झालेल्या रॅलीतला हा व्हिडीओ होता जो एडिट करुन अश्लील करण्यात आला होता. हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप यावेळी म्हात्रे यांनी केला आहे.
ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण