मुंबई : मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) काही दिवस कमी होता. मात्र आता परतीच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार आगमन केले असून यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबरोबर येत्या तीन दिवसात मराठवाडा, कोकणसह मध्य महाराष्ट्रामध्ये देखील विजेच्या कडकडाटासह पावसाची (Rain) शक्यता वर्तवली आहे.
शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार? ‘असा’ करा बचाव, वाचा सविस्तर
हवामान विभागाच्या माहितीनुसार,”परतीच पाऊस कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात गुरूवारी पाऊस होईल. त्याचबरोबर मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (Friday) तर पश्चिम महाराष्ट्र ,कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शनिवारी (Saturday) पावसाची शक्यता वर्तवली आहे”.
कौतुकास्पद! गुणवरे ता.फलटणच्या सानिया दयानंद गावडेची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड
यावर्षी मान्सून पावसामुळे अनेक शेतकरी आनंदी झाले आहेत, पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता रब्बीच्या पिकासाठी देखील परतीचा पाऊस महत्त्वाचा असल्याने येणाऱ्या तीन दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड यांच्यामार्फत खडकी येथे शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत वाटप