सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1993 सारखी मुंबई (Mumbai) पुन्हा एकदा बॉम्बनं उडवू असा धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन महिन्यांतच मुंबईमध्ये 1993 सारखे बॉम्बस्फोट होणार, असा धमकीचा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला.
“राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख”; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली खंत
आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील भेंडी बाजार, माहीम, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होण्याचा दावा या फोनकॉलवरून करण्यात आलाय. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे, हा बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचे देखील या फोन कॉलवर सांगण्यात आले आहे.
राजकारणासोबत शेतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहीर; ‘ही’ माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
दरम्यान, मुंबई एटीएसन फोन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आणि आता या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
अजित पवारांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार शेवटी बोललेच; म्हणाले…