मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम परत करावी लागणार

Big news! 'These' farmers will have to return the amount of PM Kisan Yojana

सरकार सामान्य लोकांच्या विकासासाठी अनेक योजना राबवित असते. परंतु, बऱ्याचदा लोकांकडून पात्र नसताना देखील खोटी कागदपत्रे सादर करून या योजनांचा फसवणूक करून लाभ घेतला जातो. यामुळे खरे लाभार्थी बऱ्याचदा योजनेपासून व त्याच्या लाभापासून वंचित राहतात. केंद्रसरकारच्या ( central Government) अनेक महत्त्वपूर्ण योजनांमधील महत्त्वाची योजना म्हणून पीएम किसान योजनेला ओळखले जाते. या योजनेत अनेक शेतकऱ्यांनी फसवणूक करून योजनेचा लाभ घेतल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

पंढरपुरातील मंदिरे पाडण्याच्या निर्णयामुळे, भाजपच्याच जेष्ठ नेत्याने केले नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

दरम्यान सरकारने देखील या योजनेचे नियम व अटी दिवसेंदिवस अधिक कडक केल्या आहेत. अनेक शेतकरी नियमांत बसून देखील या योजनेचा लाभ घेत असल्याने ई-केवायसी( E- KYC) करणे बंधनकारक केले जात आहे. तसेच जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सरकारकडे कर भरावा लागतो. यामुळे अधिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर भरावाच लागतो.

Sai Pallavi: ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

पीएम किसान योजनेचा ( PM Kisan Scheme) लाभ कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाही. परंतु तरी देखील काही शेतकऱ्यांनी कर भरून सुद्धा या योजनेचा लाभ घेतला. ही गोष्ट सरकारच्या लक्षात येताच सरकारने यावर मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी कर भरून देखील पीएम किसान योजनेचा फायदा घेतला आहे, त्यांना किसान सन्मान निधी परत करावा लागणार आहे.

कृषिपंपांच्या नवीन वीज जोडणी लवकरात लवकर उपलब्ध होणार; उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *