राजकीय वर्तुळात टीका युद्ध कायम सुरू असते. विरोधी पक्षातील नेत्यांचे एकमेकांना टीका करणे साहजिक आहे. परंतु, एकाच पक्षातील नेते एकमेकांवर टीका करतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटते. भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्यावर टीका करत त्यांची तुलना थेट रावणाशी केली आहे. शनिवारी ( दि.10) ला आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी ( Subramanyam Swami) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर टीका केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
नरेंद्र मोदी रावणाप्रमाणे धार्मिक असल्याचा दावा करतात परंतु, ते हा दावा करून मंदिरे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत व त्यावर ताबा मिळवत आहेत. याआधी उत्तराखंड व वारासणी मध्ये तेच झाले परंतु, नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रात देखील मंदिरे तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदींनी पंढरपूर येथील पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना आखत आहेत. हे चुकीचे असून हे थांबविण्यासाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. असे सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.
शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर श्रीगोंदा तालुक्यात एक नंबर राहणार
पंढरपूर येथील अहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन्ही मंदिरे लवकरच तोडली जाणार आहेत. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी असे करण्यात येणार आहे. यामुळे भाजपमधील जेष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे नाराज झाले असून यासाठी ते कोर्टात देखील जाणार असल्याचे त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये सांगितले आहे. याआधी गुजरात निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली होती.