
मुंबई : शिवसेना (ShivSena) नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाचे आमदार दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) गर्दी व्हावी म्ह्णून पैसे देऊन लोक जमवत आहेत. असं चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी म्हटलं. शिंदे गटाचे आमदार गद्दार आहेत, त्यांच्याच्याने शिवसैनिकांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. असं देखील ते म्हणाले आहेत.
‘या’ पिकामुळे चिकनचे वाढणार दर, कारण…
एवढंच नाही तर दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये शिंदे गट देणार आहे. त्याचबरोबर यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला, याचा आकडा देखील चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीची चाकूने गळा चिरून केली हत्त्या, कारण वाचून व्हाल थक्क
दरम्यान, संभाजीनगरमधून (Sambhajinagar) शिंदे गटाच्या वतीने ५०० गाड्या सोडण्यात आल्या असून 25 हजार लोक शिंदे गटासोबत गेल्याचा प्रश्न चंद्रकांत खैरे यांना विचारताच उत्तर देत ते म्हणाले, गद्दारांचं काहीही विचारू नका, गद्दारांशी कशी बरोबरी करायची? दसरा मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येकाला 1 हजार रुपये दिलेत त्यांनी जवळपास 52 कोटी रुपये त्यांनी खर्च केलाय. हे गद्दार सर्व काही उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी करत आहेत. असं देखील खैरे म्हणाले.