
.मुंबई : टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 79 वर्षीय अरुण बाली यांनी मुंबईमध्ये (Mumbai) अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
जगात सर्वाधिक पैशाची उलाढाल दूध व्यवसायामध्ये होते, कारण…
मागच्या काही दिवसांपासून अरुण बाली हे आजरी होते त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली हे इंडस्ट्रीतील अनुभवी कलाकार होते, त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने प्रत्येकजण भावूक झाला. यांच्या निधनावर अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.
Vinayak Raut: भाजपचे माजी मंत्री शिवसेनेत येण्याच्या तयारीत, विनायक राऊतांचा दावा
अरुण बाली यांनी 90 च्या दशकामध्ये अभिनयाला सुरवात केली होती. त्यांनी ‘आ गले लग जा’, ‘सत्या’, ‘हे राम’, ‘ओम जय जगदीश’, ‘केदारनाथ’, ‘लगे रहो ‘3 ईडियट्स’, ‘एयरलिफ्ट’, मुन्ना भाई’, ‘राजू बन गया जेंटलमैन’, ‘खलनायक’, ‘फूल और अंगारे’, ‘बागी 2’, ‘पानीपत’, ‘बर्फी’, ‘केदारनाथ’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पुणे-सोलापूर मार्गावर श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात! एक जण जागीच ठार