मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी सरकारमध्ये हालचाली सुरु, जाहीर केली नवीन यादी

Big news! To avoid the controversy of the guardian minister's post, the government is moving, a new list has been announced

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विरोधात बसलेले अजित पवार (Ajit Pawar) अचानक सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे मंत्रिपदावरून शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरु झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनेकदा या नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती. भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day of India) जवळ आला आहे. या दिवशी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) झेंडावंदन करत असतात. (Latest Marathi News)

Hera Pheri 3 | हेराफेरी 3 चित्रपटाबद्दल समोर आली मोठी अपडेट; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

परंतु अजूनही पालकमंत्र्यांची यादी (Guardian Minister List) जाहीर केली नाही. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोठे झेंडावंदन करणार? असा पेच निर्माण झाला होता. त्यावर आता राज्य सरकारकडून (State Govt) मार्ग काढण्यात आला आहे. पालकमंत्रीपदाबाबतचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यादीमध्ये जिल्ह्यांची नावे नाहीत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन केले जाणार आहे.

Rahul Gandhi Flying Kiss । राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस, स्मृती ईराणी यांनी केला गंभीर आरोप

अशी आहे यादी

  • देवेंद्र फडणवीस – नागपूर
  • अजित पवार – कोल्हापूर
  • छगन भुजबळ – अमरावती
  • चंद्रकांत पाटील – पुणे
  • दादा भुसे – धुळे
  • दिलीप वळसे पाटील – वाशिम
  • गुलाबराव पाटील – जळगाव
  • रविंद्र चव्हाण – ठाणे
  • राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
  • दादा भुसे – धुळे
  • हसन मुश्रीफ – सोलापूर
  • दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
  • सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
  • उदय सामंत – रत्नागिरी
  • विजयकुमार गावित – नंदुरबार
  • तानाजी सावंत – उस्मानाबाद
  • अतुल सावे – परभणी
  • संदीपान भुमरे – औरंगाबाद
  • सुरेश खाडे – सांगली
  • मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
  • संजय बनसोडे – लातूर
  • अनिल पाटील – बुलढाणा
  • आदिती तटकरे – पालघर
  • धनंजय मुंडे – बीड
  • धर्मराव आत्राम – गडचिरोली
  • शंभूराज देसाई – सातारा
  • अब्दुल सत्तार – जालना
  • संजय राठोड – यवतमाळ

Gautami Patil and Madhuri Pawar । गौतमी पाटील आणि माधुरी पवार दोघी एकाच मंचावर; कोण कोणावर भारी पडलं?

Spread the love