दिल्ली : उदय लळीत (Uday Lalit) यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तात्पूर्वी काल शुक्रवारी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांना निरोप देण्यात आलाय. यावेळी भाषण देताना एन.व्ही.रमणा (NV Ramana) म्हणाले, प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या हा न्यायालयामध्ये चिंतेचा विषय आहे.
सेवानिवृत्तीच्या भाषणामध्ये बोलताना रमणा यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आर्टिफिशियल एंटिलिजेन्स ची आवश्यकता भासते. पण हे बाजारातून देखील खरेदी करता येणार नाही असेही रमणा यांनी स्पष्ट केले. रमणा म्हणाले की असे भरपूर मुद्दे आहेत, यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण पद सोडण्याआधी त्यावर बोलणार नाही, असे देखील ते म्हणाले
दरम्यान, यावेळी बोलताना वरिष्ठ वकील दुष्य़ंत दवे म्हणाले, रमणा हे जनतेचे न्यायाधीश आहेत. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झाली की मुख्य न्यायमूर्तींचे सेरेमोनियल बेंचमधून लाईव्ह स्ट्रिमिंग झाले. ज्याचे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर वेबकास्ट करण्यात आलंय.