
दिल्ली : देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार याची माहिती समोर आली आहे. न्यायमूर्ती उदय लळीत (Uday Lalit) हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असणार आहेत. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे.
माहितीनुसार, सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा (A. V. Ramana) यांनी स्वतः गुरुवारी केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या ३ ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली आहे. सरन्यायाधीशपदासाठी उत्तराधिकारी निवडण्याबाबत पत्रव्यवहार ३ ऑगस्टला झाला होता. यानंतर सरन्यायाधीश रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत यांच्या नावाची घोषणा केली.
सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा १६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त होणार आहेत. आणि त्यांनंतर यू. यू. लळीत हे पुढील नवे सरन्यायाधीश असतील . न्यायमूर्ती लळीत देखील ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील.