उजनी पाटबंधारे विभागाचा (Ujni Irrigation Department) उजवा कालवा फुटल्याची माहिती समोर आली आहे. हा कालवा फुटल्याने तेथील आसपासच्या शेतात पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंब, ऊस आणि इतर पीक देखील वाहून गेली आहेत.
‘पठाण’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पठाण चित्रपटात खूप…”
मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावातील शेतकऱ्यांचे कालवा फुटल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. डाळिंबासह ऊस आणि इतर पिके वाहून गेली आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे.
रशियाचा मुलगा महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळेत रमला! चक्क मराठीचे गिरवतोय धडे
कालवा फुटल्यानं द्राक्ष बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या रानातील मोटरी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.