मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या अवकाळी पावसासह गारपीठ देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे कांदा, गहू, हरभरा, द्राक्षे, केळी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी रोज घालते नवऱ्याला शिव्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली आहे. नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन शेतकरी जखमी झाले आहेत.
या चार पाच पोरींना खोऱ्याने पैसा मिळतोय, जेष्ठ तमाशा कलावंताची गौतमी पाटीलवार जोरदार टीका
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे शेतातील गहू, द्राक्षे, ज्वारी, आंबा, मोसंबी, कलिंगड, टरबूज, भाजीपाला यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सर्वात मोठी बातमी! राज्यात अवकाळी-गारपिटीचा तडाखा, नद्या दुथडी भरून वाहिल्या