मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Big news! Unseasonal rain at night in Nashik district, damage to farmers' crops

४ आणि ५ मार्चला पाऊस पडणार असा अंदाज लावण्यात आला होता. आता हा अंदाज खरा झाला आहे. रात्री नाशिक (Nashik) शहरासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Hsc Exam: बुलढाण्यात पेपरफुटीप्रकरणी दोन शिक्षकांना अटक

एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला कावडीच्या सुद्धा भाव मिळत नाही तर दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

नाशिकसह ग्रामीण भागात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील येवला पट्ट्यात निफाड, लासलगावसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा, कांदा, गहू, द्राक्ष, त्याचबरोबर पालेभाज्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

“…यांना शरम नाही”, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर ७ मार्चला गारपिट होण्याची देखील शक्यता आहे.

तरुणीने पहिल्यांदा रणबीरला किस करण्याचा प्रयत्न केला अन् नंतर लागली रडायला, पाहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *