Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! आज नागपूरमध्ये ‘मविआ’ची वज्रमूठ सभा; ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित

Big news! Vajramooth meeting of 'Mavia' in Nagpur today; 'These' legendary leaders will be present

राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने नागपूर येथे वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. महाविकास आघाडीने पहिल्यांदाच नागपुरात सभेचे आयोजन केले आहे. नागपुरात आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे.

लग्न कधी करणार? मुलगी कशी पाहिजे? आदित्य ठाकरे हसत म्हणाले…

या सभेसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. ही सभा कशी होणार? कोण उपस्थित राहणार? याबाबत अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे या सभेला येणार आहेत. त्याचबरोबर सभा ही महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची आहे. कोणत्याही नेत्याची सभा नाही त्यामुळे कोण येतील हे त्यांचे त्यांचे पक्ष ठरवतात. असे दानवे म्हणाले आहेत.

“…म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळात कायम १० वाजून १० मिनिटे झालेली असतात” रोहित पवारांनी सांगितले खरे कारण

त्याचबरोबर कालपासून अजित पवार या सभेला उपस्थित राहणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र याबाबत देखील अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. दानवे म्हणाले, अजित पवार यांनीच या कार्यक्रमाचचे आयोजन केले आहे. त्यामुळे अजितदादा ही या सभेला येतील. असं ते म्हणाले आहेत.

सर्वात मोठी बातमी! गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या

दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे या सभेमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना विशेष व मोठी खुर्ची देण्यात येणार नाही. याठिकाणी सर्व नेत्यांना एकसारख्याच खुर्च्या बसण्यासाठी देण्यात येणार आहेत. याआधी छत्रपती संभाजीनगर ( Sambhajinagar) येथे झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठी खुर्ची देण्यात आली होती. ही खुर्ची इतर नेत्यांना देण्यात आलेल्या खुर्चीपेक्षा वेगळी होती. यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. म्हणून नागपूरच्या वज्रमूठ सभेत (Vajramuth Meeting) हा बदल करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

Spread the love
Exit mobile version