रितेश आणि जेनेलियाचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावत आहे. अगदी काहीच दिवसांत या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) याने प्रथमच दिग्दर्शक म्हणून काम केले आहे तर जेनेलिया डिसूझा हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा पाऊल टाकले आहे. या चित्रपटातील अजय-अतुल यांची गाणी व इतर कलाकारांचा अभिनय देखील चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये दिग्गज अभिनेते अशोक सराफ ( Ashok Saraf) यांनी या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“वडील कायम मारहाण करायचे म्हणून…”, वाचा उर्फी जावेदच्या संघर्षाची कहाणी
सध्या अशोक सराफ एका आजारानं त्रस्त असून यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या आजाराविषयी माहिती दिली आहे. निवेदिता सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अशोक सराफ यांना लॅरेंजायटिस आजाराने ग्रासले आहे. या आजारामुळे त्यांना बोलता देखिल येत नाही.”
मोठी बातमी! विमान कोसळून ३० जणांचा मृत्यू
सध्या अशोक सराफ मीडियासमोर किंवा नाटकात पाहायला न मिळण्याचं कारण म्हणजे, लॅरेंजायटिस या आजारामुळे अशोक सराफ यांच्या घशावर सूज आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. लॅरेंजायटिस आजार असलेल्या व्यक्तींना विश्रांती घेण्याची जास्त गरज असते.
धक्कदायक! नायलॉन मांजामुळे दहा वर्षीय चिमुरडी गळा कापल्याने गंभीर जखमी