सध्या एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री जमुना (Jamuna) यांचे आज हैद्राबाद या ठिकाणी निधन झाले आहे. त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शरद पवारांविषयी आदर राखून बोलावे, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा
तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये जमुना यांनी काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी काही दिवस हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. ‘मिस मेरी’, ‘मिलन’, ‘रिश्ते नाते’, ‘दुल्हन’, ‘बेटी बेटे’, ‘एक राज’, हे त्यांचे हिंदी मधील चित्रपट प्रचंड गाजले आहेत.
एक दोन नव्हे तब्बल आठ जणांनी केला स्कुटीवर एकत्र प्रवास; पाहा व्हायरल VIDEO
Saddened to hear about the demise of #Jamuna garu. Will fondly remember her for all her iconic roles and her immense contribution to the industry. My condolences to her family and loved ones 🙏
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) January 27, 2023
महेश बाबू यांनी ट्वीट करत जमुना यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, “जमुना गरु यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या सर्व प्रतिष्ठित भूमिकांसाठी आणि इंडस्ट्रीतील अतुलनीय योगदानासाठी त्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या संवेदना.’ असे त्यांनी ट्विट केले आहे.
सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; स्वतःच केला खुलासा