सध्या एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री आणि सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असेलले विनोद तावडे यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्या आईने वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माहितीनुसार, विनोद तावडे यांच्या आईचे नाव विजया तावडे असे आहे. यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. याबाबत माहिती विनोद तावडे यांनी ट्विट करत दिली आहे.
ब्रेकिंग! शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द
विनोद तावडे यांनी ट्विट करत लिहिले की, “अत्यंत दु:खाने कळवत आहे की माझी आई विजया श्रीधर तावडे यांचं दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले आहे”, असं ट्विट त्यांनी वाईट बातमी दिली आहे. आईच्या निधनाने तावडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
बड़े दुख के साथ मैं आपको सूचित कर रहा हूँ कि मेरी माता जी विजया श्रीधर तावडे दीर्घकालीन बीमारी के चलते मुंबई में सांसारिक जीवन त्याग कर परलोक सिधार गयी हैं। pic.twitter.com/WwhEQXxllS
— Vinod Tawde (@TawdeVinod) April 10, 2023
दरम्यान, तावडे यांच्या आईंचं निधन झाल्याने राज्यातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मातोश्री विजयाताई श्रीधर तावडे यांचं निधन झाल्याचं दुःखद बातमी समजली. आई जाण्याची वेदना कधीही भरुन न येणारी असते. तावडे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.”
रिंकू सिंगने टीम इंडिया बाबत दिली मोठी प्रतिक्रिया!
राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री @TawdeVinod यांच्या मातोश्री
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 10, 2023
विजयाताई श्रीधर तावडे यांचं निधन झाल्याचं दुःखद बातमी समजली .आई जाण्याची वेदना कधीही भरुन न येणारी असते. तावडे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!