रस्त्यांवरचे नियम मोडले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना शिक्षा होतेच. यामध्ये मतभेद केला जात नाही. मग त्यामध्ये तुम्ही कितीही मोठी सेलिब्रिटी असला तरीही दंड हा भरावाच लागतो. काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) व अमिताभ बच्चन (AmitabhBachchan) यांनी मोठमोठ्या गाड्या सोडून बाईकवरून प्रवास केला. मात्र हा प्रवास त्यांना महागात पडला आहे. या बाईक राईडची सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याचे व्हिडिओ व फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. परंतु नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी नागरिकांनी मागणी आहे.
मुंबई पोलिसांनी नियमांचे दखल घेऊन त्यांना दंड ठोठावला आहे. अनुष्का शर्माचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या बॉडीगार्डसह बाईकवर पाठीमागे बसली आहे. जुहू परिसरात ट्राफिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनुष्का तिच्या बॉडीगार्डसह बाईकवर प्रवास केला. अनुष्का आणि तिचा बॉडीगार्ड सोनू या दोघांनीही हेल्मेट घातला नव्हतं. त्यामुळे त्या दोघांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी अनुष्का शर्मा आणि तिचा बॉडीगार्ड सोनू शेख याला दहा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सावधान! उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; एकदा वाचाच
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अभिताभ बच्चन हे त्यांच्या कामामध्ये खूप सक्रिय असतात व ते कामासोबतच त्यांच्या वेळेला देखील तितकच महत्त्व देतात. त्यांचं चित्रपटाचं व जाहिरात चित्रीकरणाचं काम सतत सुरू असतं. यावरून त्यांचं कामावर असणार प्रेम दिसून येतं. अभिताभ बच्चन यांचा देखील एक सोशल मीडिया वरती फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अभिताभ बच्चन गाडीवर बसून प्रवास करत आहे. यावरून अभिताभ बच्चनचा चहात्यांना प्रश्न पडला की यांच्यावर ही वेळ का आली असावी?
लग्न झाले, नवऱ्याने हनिमूनचं प्लॅनिंगही मात्र तिने…, बीडमधील घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का
परंतु मुंबईतल्या (mumbai) वाहतूक कोंडीमुळे त्यांना शूटिंगला पोहोचायचं असल्यामुळे त्यांनी एका अनोखळी दुचाकीस्वाराला इच्छित स्थळी सोडण्याची विनंती केली. व या अनोख्या दुचाकी स्वराचे आभार देखील सोशल मीडियावरून व्यक्त केले. राईडसाठी थँक्स बडी… तुम्हाला माहिती नाही; पण तुम्ही मला कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलं अस अभिताभ बच्चन ने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. अभिताभ बच्चन ज्या दुचाकीस्वराच्या गाडीवर पाठीमागे बसले आहेत त्याने व अभिताभ बच्चनने हेल्मेट घातले नाही. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. व मुंबई पोलिसांनी त्यांना दंड देखील ठोठावला आहे.