शिंदे व ठाकरे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल ( Sattasangharsh Result) आज सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निकालाची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून शिवसेनेमधील ४० आमदारांना फोडले आणि भाजपचे बोट धरून शिंदे- फडणवीस सरकार स्थापन केले. यासंदर्भातील वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला होता. कित्येक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आज हा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आम्ही समाधानी आहोत. या निकालामुळे लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णतः विजय झाला आहे. या निकालातील काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरले आहे.
कारण, उद्दव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांचा असणार आहे. अध्यक्षच त्यावर योग्य तो निर्णय घेतील. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
ब्रेकिंग! उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर घड्याळाचे काटे फिरवले असते – सुप्रीम कोर्ट