राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Sinh Koshyari) काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात होती. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आपले भावी आयुष्य वाचन व लेखनात घालवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
खुशखबर! सर्वच कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक 3 हजारांची पेन्शन
या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही सन्मानाची बाब आहे. मागील तीन वर्षात महाराष्ट्राकडून मिळालेले प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी स्पष्टपणे राजकीय जबाबदारी मधून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली.
देशातील 80 टक्के तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार; शरद पवारांचे मोठे वक्तव्य
मधल्या काळात भगतसिंग कोश्यारी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत होते. त्यामुळे भाजपा समोरील आव्हाने देखील वाढत होती. आता त्या आव्हानांच्याच पार्श्वभूमीवर कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान कोश्यारी यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोदींशी चर्चा करण्याऐवजी राष्ट्रपतींकडे निवेदन द्यायला हवे होते. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.