महाराष्ट्राच्या सत्तांसंघर्षांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गट आणि शिवसेनेच्या याचिकांची यादी करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विषयावर सर्वोच्च न्यायालय आज ( ता.14) सकाळी 10:30 वाजता सुनावणी ( Hearing) करेल. यामुळे लवकरच शिंदे सरकार टिकणार की कोसळणार याचा निर्णय होणार आहे.
अजित पवारांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना पायउतार करणाऱ्यांचा बदला…”
सर्वोच्च न्यायालयाच्या यादीत या प्रकरणाला 501 क्रमांक देण्यात आला आहे. तसेच घटनापीठामध्ये न्या. शहा, न्या.मुरारी, न्या.हिमा कोहली, न्या. नरसिंह यांचा समावेश आहे. सत्तासंघर्षाच्या बाबतीत न्यायालयाने 8 मुद्दे निश्चित केले आहेत.
आदिल खानबाबत राखी सावंतने केला मोठा खुलासा म्हणाली, “गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करुन तो…”
या आधीच्या सुनावणीमध्ये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने १६ आमदारांचे निलंबन प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली होती. या मागणीवर आज निर्णय घेतला जाऊ शकतो.
राष्ट्रवादीला मित्रपक्षाकडून धक्का! 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून शिवसेना सोडली. यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला होता. यानंतर शिंदेंनी भाजपच्या मदतीने व 40 बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. परंतु, हे सरकार असंविधानिक आहे. असे म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सलमान खानचे मोठ वक्तव्य म्हणाला, “मी माझ्या स्वतःच्या मर्जीने अविवाहित राहीलेलो नाही”