मोठी बातमी! ५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या तरुणाला अटक

Big news! Youth arrested for making wraps on 50 boxes

मागच्या काही महिन्यानापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. यांनतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. दरम्यान यानंतर दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच झाले. यानंतर ठाकरे गटातील आमदारांनी शिंदे गटातील आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला.

मोठी बातमी! रिझर्व बँकेने व्याजदर ठेवले ‘जैसे थे’

शिंदे गटावर ठाकरे गटाचे आरोप तर सुरूच होते मात्र यावर एका रॅपरने देखील रॅप गाणं तयार केलं होत. राज मुंगासे या रॅपरने गाणं तयार केलं होतं. या गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. यांनतर याची सगळीकडे जोरदार चर्चा होती. दरम्यान आता त्या रॅपरच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. याबाबत अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

“तरुणांनी बाईकवर केला जीवघेणा स्टंट अन् पुढे घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं.आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. असं ट्विट आव्हाडांनी केले आहे.”

करण जोहरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “मला अनुष्काचं करिअर उद्ध्वस्त…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *