पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग यांसारखे धोकादायक प्रकार करताना अनेकदा अपघात होतात. हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग ( Paragliding) करताना एका युवकाचा मृत्यु झाला आहे. पॅराशूटचा बेल्ट निसटून खाली पडल्यामुळे हा युवकाचा मृत्यूमुखी पडला. हा युवक सातारा जिल्ह्यातील शिरवळ तालुक्यातील असून सूरज शहा असे त्याचे नाव आहे. अवघ्या 30 वर्षाच्या सुरजचा मृत्यु झाल्याने या शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे.
पडळकरांचा मोठा खुलासा! बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी
नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधून सूरज आपल्या मित्रांसह हिमाचल प्रदेशमध्ये ( Himachal Pradesh) गेला होता. त्याचे वडील उद्योजक असून त्यांना देखील या घटनेने धक्का बसला आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर चे सेलिब्रेशन एकत्र करण्यासाठी मित्रांसोबत कुलू-मनालीला गेलेला सूरज सुमारे 800 फुटावरून खाली पडला. या अपघातानंतर सूरजसोबत असणारे त्याचे मित्र देखील घाबरून गेले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोटींची तरतूद; अधिवेशनात घेतला ‘हा’ निर्णय
कुलू-मनाली येथील प्रेक्षणीय स्थळे आहेतच, पण या सोबतच पॅराग्लायडिंग हे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास आकर्षण असते. यामुळे सूरज व त्याच्या मित्रांनी या ठिकाणी पॅराग्लायडिंग केले. यावेळी डोभी येथून पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच सूरजचा सेफ्टी बेल्ट खुला झाला आणि त्यानंतर तो खाली कोसळला. सुरजसोबत पायलटचा देखील गंभीर अपघात झाला असून तो गंभीर जखमी आहे.