सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्याच झालं असं की, शेतीमधील वादांमुळे संगनमतांकडून कुटूंबीयांवर अन्याय झाल्यानंतर संतोष गायधने याच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जातोय . खोट्या केस(case) दाखल केल्याने कुटुंब भीतीत जगतंय. अण्णा हजारे, वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्री लोकांनाही निवेदन केलं तरी पण काहीच होत नाही, त्यामुळे गायधनेंनी अण्णा हजारे यांची हत्या करणार आहे,असा इशारा दिलेला आहे.
अजित पवार खरंच भाजपमध्ये जाणार का? संजय राऊत म्हणाले, “शेवटी प्रत्येकजण वैयक्तिक मतं…”
यासंदर्भात मिळालेली माहिती ही अशी, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार आहे, असा इशारा दिलेला आहे. शेतीमधील तंट्यातून संगनमताने कुटुंबातील लोकांवर अन्याय झाला असा आरोप केला आहे. शेतीमधील वादातून गटामधील ९६ लोकांनी कुटुंबातील लोकांवर दबाव आणलेला आहे तर, खोट्या केस दाखल करून भीती दाखवली जात आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. कुटुंबातील लोक भीतीच्या वातावरणात जगत आहे.
याप्रकरणात अण्णा हजारें बरोबर वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना निवेदन दिले आहेत. परंतु तरीसुद्धा कारवाई होत नाही.त्यामुळे कुटुंबीय खूप हतबल झाले आहेत. राष्ट्रपतीं यांच्याकडे या प्रकरणी आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे असे, संतोष गायधने म्हणाले आहेत . त्याचबरोबर, अण्णा हजारे हे या प्रकरणामध्ये मॅनेज झालेले आहेत असाही आरोप गायधने यांनी केला आहे. त्याचप्रमाणे १ मे रोजी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी मध्ये जावून हत्या करणार आहे, असा इशारा दिला आहे.