Chhagan Bhujbal । मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून (Maharashtra Sadan Scams) दोषमुक्तीसाठी अर्ज करणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ईडीकडून (ED) 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. 2 वर्षांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाने भुजबळ यांना जामीन मंजूर केला. (Latest Marathi News)
Political News । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
परंतु त्यानंतर या निर्णयाला ईडीने 2018 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले. विशेष न्यायालयाने 16 ऑक्टोबर रोजी भुजबळ यांना पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी देत परदेशात जाण्याची अनुंमती दिली. अशातच आता छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत आहे असे ईडीने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.
ST Mahamandal । भारीच! खिशात एकही रुपया नसताना करता येणार लालपरीने प्रवास, कसं ते जाणून घ्या
मात्र पंकज भुजबळाविरोधातील खटला ईडीने मागे घेतला नाही. न्यायालयाकडून ईडीची मागणी मान्य करण्यात आली आहे. नुकतीच न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठापुढे या प्रकरणी पार पडली. यावेळी हा निर्णय ईडीने घेतला आहे. ईडीच्या या निर्णयामुळे छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
Pune News । पर्यटन बेतलं जीवावर! तरुणाचा १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू