निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ( NCP) राष्ट्रीय दर्जा काढून टाकण्यात आला आहे. यामुळे अगामी निवडणुकांमध्ये पक्षाला इतर ठिकाणी घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्या चिन्हावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून आधीच्या घड्याळ चिन्हावरच लढवली जाणार आहे.
पक्षाकडून विनंती केल्यामुळे निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत घडयाळ चिन्ह वापरण्यासाठी NCP ला परवानगी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलासा मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निर्णय फक्त कर्नाटक विधानसभा निवडणुकीपुरताच मर्यादित असणार आहे. निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कर्नाटकमध्ये पाच ते सहा सभा घेणार आहेत.
खोपोलीच्या अपघाताबाबत जखमी प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली धक्कादायक माहिती!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण ४६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासाठी आधी फ्रीज चिन्ह मिळाले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ही निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमधील भाजपचा एक नेता राष्ट्रवादी मध्ये आल्याने त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी ( R Hari) यांनी दिली आहे.
भाजप राष्ट्रवादी फोडणार? संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ