Rohit Pawar | मुंबई : बारामती ॲग्रो कारखान्याने (Baramati Agro) मुदतीच्या २ दिवस अगोदरच गाळप हंगाम सुरू केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर या कारखान्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा रद्द करण्यासाठी बारामती ॲग्रो कारखान्याने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. (Latest Marathi News)
हायकोर्टाने बारामती ॲग्रोवरील कारवाईला 11 सप्टेंबरपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासह कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडून देण्यात आले होते.
Eye Flu । सावधान! राज्यात झपाट्याने पसरतेय डोळ्यांची साथ, अशी घ्या काळजी
रोहित पवार यांना या प्रकरणी तात्पुरती स्थगिती दिली असली तरी त्यांना पूर्णपणे दिलासा मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जर रोहित पवार यांना या प्रकरणी दिलासा मिळाला नाही तर त्यांना खूप मोठा फटका बसू शकतो.