
महाविकास आघाडीला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीची मतं फुटल्याने भाजपचे शिवाजी कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेली सहकारी बँक भाजपच्या ताब्यात गेली आहे.
महाविकास आघाडीचे उदय शेळके यांच्या निधनानंतर अध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती. यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी अध्यक्षपदासाठी दावेदारी केल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. आणि यात भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
“आता स्त्रियांनी…”, महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
माहितीनुसार, या निवडणुकीमध्ये शिवाजी कर्डिलेंना दहा मतं तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मतं मिळाली. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला आहे.
तुम्हाला सतत मोबाईल पाहण्याची सवय आहे का? असेल तर आताच बदला नाहीतर तुमचा ब्रेन…
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंगळवारी नगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नवीन अध्यक्ष निवडीबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडाळाशी चर्चाही केली होती. त्यानंतर चंद्रशेखर घुले यांनी या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. सर्वांना वाटले ही निवडणूक बिनविरोध होईल मात्र अंतिम क्षणी कर्डिले यांनी अर्ज भरला असून ते विजयी झाले. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
धक्कादायक! शिळे अन्न खाल्ल्यामुळे बारावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू