
मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे. खुद्द अजितदादांनी देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, तरीही चर्चा काही थांबता थांबत नाहीत.
मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा
या सर्व चर्चा सुरु असतानाच आता कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी बनवण्यात आली आहे, आणि त्यामधून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
प्रवाशांनी गच्च भरलेली बस, घाटातच तुटला एक्सलेटर अन् व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा!
दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाच्या शिबीरालाही अजित पवार गैरहजर होते. याबाबत त्यांना विचारले असता माझा पुणे दौरा नियोजित होता. त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होत. मात्र आता स्टार प्रचारकाच्या यादीतून नाव वगळण्यात आहे. त्यामुळे याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत.
खुशखबर! फक्त पॅनकार्डवर मिळणार ५० हजारांचे कर्ज; जाणून घ्या सविस्तर