Amol Kolhe । लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बडे नेते सभा घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)
Rally Campaign । मोठी बातमी! मुंबईचं राजकीय वातावरण पेटलं, भाजपच्या प्रचार रॅलीवर दगडफेक
शिरूर मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख हा तुतारी असाच केला आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य आहे. बँड वादनात त्याचा समावेश होत असतो. पण या ट्रम्पेटचे मराठी भाषेतून भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारीच केले आहे.
Accident News । बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
त्यामुळेच अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढले आहे. या मतदारसंघात तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होऊ शकतो. दरम्यान, याप्रकरणी अमोल कोल्हे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अमोल कोल्हे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.