Shiv Sena News । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शेकडो समर्थकांसह बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

Big shock to Eknath Shinde! Bada leader with hundreds of supporters will join the Thackeray group

Shiv Sena News । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती केल्याने शिवसेना पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. शिंदेच्या बंडानंतर बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. अजूनही ठाकरे गटाची गळती सुरु आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी हार न मानता पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ठाकरेंची साथ सोडणारे काही माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. (Latest Marathi News)

Onion Rate । कांदा प्रश्नावरून सरकारचा मोठा निर्णय! प्रतिक्विंटल २४१० दराने होणार खरेदी

आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchore) हे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमवेत नगर जिल्ह्यातील शेकडो समर्थक पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला शिर्डी लोकसभा मतदारसंघात खूप मोठा धक्का बसणार आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे हे देखील आजच पक्षात प्रवेश करणार आहेत.

क्रिकेट विश्वावर शोककळा! वयाच्या 49व्या वर्षी प्रसिद्ध क्रिकेटपटूनं घेतला अखरेचा श्वास

मातोश्रीवर आज दुपारी १२ वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे देखील ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्षाच्या गळतीमुळे एकनाथ शिंदेच्या चिंतेत भर पडली आहे.

Benefits Of Eating Fish । हे आहेत मासे खाण्याचे फायदे, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Spread the love