Onion Price । शेतकऱ्यांना मोठा धक्का! कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारने घेतला निर्णय

Big shock to farmers! The government has taken a decision to curb onion prices

Onion Price । देशात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे (Onion) पीक घेतले जाते. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी चांगले दर मिळतातच असे नाही. अनेकदा शेतकऱ्यांना चांगले दर (Onion Rate) मिळत नसल्याने कांदा फेकून द्यावा लागतो. यंदाच्या वर्षीही शेतकऱ्यांवर अशीच काहीशी वेळ आली आहे. अशातच आता कांदा शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी आहे. (Latest Marathi News)

Post Office Saving Schemes । पोस्ट ऑफिसची पती-पत्नीसाठी शानदार योजना, होईल 59,400 रुपयांचा फायदा

कांद्याचे दर (Onion Increasing Rate) रोखण्यासाठी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार बफर स्टॉकमधून (Buffer stock) 3 लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात सोडणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर नियंत्रणात येतील. परंतु याचा सर्वात मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Politics News | ‘या’ कारणास्तव काका- पुतण्याची भेट झाली असावी, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, 2020-21 मध्ये केवळ 1 लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यात आला होता. परंतु यावर्षी त्यात वाढ केली आहे. कांद्याची साठवणूक करताना मोठ्या प्रमाणात नासाडी होते. याच पार्श्वभूमीवर भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार देखील केला आहे. यावर्षी बफर स्टॉकसाठी 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. जर गरज पडली तर सरकारकडून आणखी काही कांद्याची खरेदी केली जाणार आहे.

Google Maps Offline । बिनधास्त फिरायला जा! इंटरनेटशिवायही ‘असे’ चालेल गुगल मॅप

Spread the love